PHOTO: महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी! राज्यातील विविध भागातील संस्कृतीचं दर्शन, पाहा खास फोटो
फॅशन शो म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतं ते तोकडे कपडे परिधान केलेल्या महिला, पण याला अपवाद ठरते ती महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश विभागातील संस्कृतीचं दर्शन घडलं.
स्पर्धकांना अस्सल मराठी वेशाचा ठसका, त्याला पाश्चात्य संस्कृतीचा टच, बोलीभाषेतून शब्दफेक अन बुद्धिमतेचा कस लावावा लागला.
या सर्व पातळीवर सरस ठरलेल्या महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञीला चारचाकी गाडी बक्षीस रुपात देण्यात आली.
राज्यभरातून कुमारी आणि सौभाग्यवती गटातील एकवीस सौंदर्यवतींची या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती.
विविध जाती-धर्मातील सहभागी स्पर्धकांना इथं केवळ मराठी भाषा अन् पेहरवाचाच वापर करणं बंधनकारक होतं.
महाराष्ट्राच्या संस्कृतीच दर्शन एकाच छताखाली पाहता अन अनुभवता यावा.
तसेच त्याचा प्रसार अन प्रसिद्धी व्हावी हा यामागचा शुद्ध हेतू होता.
यासाठी पुण्यातील खान्देश अहिराणी कस्तुरी मंचचा हा खटाटोप आहे.
image 10