In Pics : यळकोट यळकोट जय मल्हार! जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Dec 2021 05:07 PM (IST)

1
जोडून आलेला शनिवार- रविवार आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
सकाळपासून आज दीड ते 2 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

3
मंदिर परिसरातदेखील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
4
आज जेजुरीत सोशल डिस्टनसिंगचा पूर्णपणे फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे.
5
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या तीर्थक्षेत्र जेजूरी नगरीत आज भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
6
भंडाऱ्याच्या उधळणीने जेजुरी गड पिवळा धम्मक झाला आहे.
7
हजारो भाविक आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला आज जेजुरी गडावर दाखल झाले आहेत.