In Pics : 60 व्या राज्य नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून 'खानदानी' अव्वल

६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून वलय नाट्य संस्था, पुणे या संस्थेच्या 'खानदानी' या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे याबाबतची घोषणा केली आहे. खानदानी या नाटकाची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

दिग्दर्शन, नेपथ्य आणि प्रकाश योजना विभागातही खानदानी या नाटकाने बाजी मारली आहे.
ही स्पर्धा 21 फेब्रुवारी 2022 ते 7 मार्च 2022 या कालावधीत पार पडली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांचा हा निकाल आहे.
पुण्याच्या स्पर्धेचं परिक्षण सुरेश खानवीलकर, संजय टिपुगडे आणि अंजली केतकर यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड या केंद्रातून 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत विषाद या नाटकाने बाजी मारली आहे.
पिंपरी -चिंचवड स्पर्धेचं परिक्षण मंदन दंडगे, संदीप देशपांडे आणि असावरी शेट्ये यांनी केले आहे.
दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा आणि उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक ही पारितोषिके सुद्धा विषादला मिळाली आहेत.
समा ए सरहद या नाटकातील अनुष्का आपटेला अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालं आहे.