Cyclone Tauktae | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! तोक्ते चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा, पाहा फोटो
अरबी समुद्रात निर्माण झालेलं तोक्ते चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर आदळले असून यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत दाखल झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे आता राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे मस्जिदीवरील पत्रे उडून गेल्याची माहिती आता समोर येत आहे. शिवाय, आंबोळगड, साखरीनाटे, जैतापूर या गावांमधील काही घरांवरी पत्रे देखील उडून गेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात वीज पुरवठा खंडित झाला असून नेटवर्कला देखील समस्या येत आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांवरती झाडे देखील उन्मळून पडली आहेत.
देवरूखमधील एका घरावर झाड कोसळलं असून सुदैवानं या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अद्याप देखील चक्रीवादळाचा प्रभाव दिसत असून साधारण पाच वाजल्यानंतर किंवा चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर नेमकं नुकसान आणि परिस्थिती समोर येणार आहे.
सद्यस्थितीत जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात साधारण 2 हजारच्या आसपास नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.
तौक्ते चक्रीवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आज सकाळपासून घोंगावत होतं. रेडी ते विजयदुर्ग या 120 किलोमीटरच्या जिल्ह्यातील किनारपट्टीसह जिल्ह्यात सर्वच भागात चक्रीवादळामुळे नुकसान झालं आहे.
जिल्ह्यातील 70 ते 80 घरांचे नुकसान झाले असून अजूनही जिल्ह्यात 60 ते 70 किमी वेगाने वारे वाहत आहेत.
जिल्ह्यातील अनेक मार्ग झाडं पडल्यामुळे बंद आहेत. तर घाटमाथ्याला जोडणारा आंबोली घाटात झाड व दरडी कोसल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.
उद्याही जिल्ह्यात किनारपट्टी भागात वादळी वारे व समुद्र खवळलेला राहील. जिल्ह्यात रात्रीपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे वैभववाडी, देवगड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे.
जिल्ह्यात 100 ते 110 घरांचे नुकसान झाले असून अजूनही जिल्ह्यातील किनारपट्टी भागात वादळ घोंगावत आहे.