In Pics | कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरी सजली, पाहा फोटो

कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षानंतर कार्तिकी यात्रा होणार आहे. कार्तिकी यात्रेसाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाविकांची यात्रा सुखरूप करण्यासाठी तब्बल साडे सात हजार अधिकारी आणि कर्मचारी झटत आहेत. एकंदरीतच कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी अवघी पंढरी सज्ज झाली आहे

यंदा ठाकरे सरकारने कार्तिकी यात्रा भरविण्यास संपत्ती देताना 65 वर्षांपुढील वारकरी , गरोदर महिला आणि लहान मुलांसाठी असणारे निर्बंध उठविल्याने या सर्व घटकांना आता कार्तिकी यात्रेत सहभागी होता येणार आहे
विठ्ठल भक्तात सर्वात जास्त संख्या ही 65 वर्षांपुढील वारकऱ्यांची असते मात्र गेल्या दोन वर्षांपासून या भाविकांना आपल्या लाडक्या विठुरायाला पाहता आले नव्हते त्यांनाही यंदा कार्तिकीचा आनंद घेता येणार आहे .
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विठुरायाचे दर्शनासाठी गोपाळपूरापर्यंत दर्शन रांग उभी करण्यात आली आहे.
कार्तिकी यात्रा काळात आजपासून 24 नोव्हेंबरपर्यंत लाखो भाविकांना 24 तास दर्शन मिळणार आहे.
यंदा चंद्रभागेमध्ये महिला भाविकांना स्नानानंतर कपडे बदलण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या चेंजिंग रुम उभारण्यास सुरुवात झाली आहे. (सर्व फोटो सौजन्य - सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते)