गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पाणावलेल्या डोळ्यांनी हजारो कष्टकऱ्यांनी दिला अखेरचा निरोप
आयुष्यभर मिळवलेले हजारो लोकांच्या प्रेमाचे वैभवाच्या साक्षीने आज जेष्ठ शेतकरी कामगार पक्षाचे भीष्माचार्य भाई गणपतराव देशमुख यांच्यावर आज सांगोला येथील सूत गिरणीच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी 30 हजारापेक्षा जास्त कष्टकरी, शेतकरी वर्गाने साश्रूपूर्ण नयनांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.
आज सकाळीपासून सांगोल्यात दुतर्फा हजारो नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
सकाळी सडे नऊ वाजता गणपतराव यांचे पार्थिव सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ येताच अँब्युलन्समधून सजवलेल्या टेम्पोत त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले.
आपल्या लाडक्या नेत्याचे पार्थिव पाहताच अबाल वृद्ध धाय मोकलून रडत होते.
णपतराव यांचे ज्येष्ठ पुत्र पोपटराव , दुसरे पुत्र चंद्रकांत, नातू डॉ. बाबासाहेब आणि डॉ. अनिकेत यांनी गणपतराव देशमुख याना मंत्राग्नी दिला.
यावेळी आबासाहेब अमर रहे च्या घोषणात आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा लाल सलामी दिली .
एकाच मतदारसंघात एकाच पक्षाच्या नेत्याला चार पिढ्यांनी मतदान केलेले ते राज्यातील एकमेव नेते होते