Photo : गाढवावरून जावयाची जंगी मिरवणूक, धुलिवंदनानिमित्त अनोखी प्रथा
आज संपूर्ण देशभर धुलिवांदनचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र आजच्या दिवशी बीडमध्ये जावयाला चक्क गाढवावर बसवून त्याची गावभर मिरवणूक काढली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीड जिल्ह्यातील विड्या गावात ही परंपरा जपली जाते.
मागच्या 90 वर्षा पेक्षा जास्त काळापासून बीडच्या केज तालुक्यातील विडा या गावात हटके पद्धतीने धुलिवंदन साजरी होते.
गावच्या जावयाला चक्क गाढवावर बसवून मिरवणूक काढण्यात आली.
ही अनोखी परंपरा जहागीरदार आनंदराव देशमुख यांनी सुरु केली होती.
विडा गावात 150 घरजावई कायमस्वरुपी वास्तव्यास आहेत. धुलीवंदनाच्या दोन दिवस आगोदार जावई शोधण्याची मोहीम गावकरी हाती घेतात.
. बरेच जावई गावकऱ्यांच्या सापळ्यातून निसटूनही जातात. कोणता जावई कुठे आहे याचा तपास करण्यासाठी गावात पथकही नेमले जातं.
यावर्षी 19 जणांच्या पथकाने जावयाचा शोध घेतला आणि केज तालुक्यातल्या जवळबन येथील अविनाश करपे यांना यावर्षी गाढवावर बसण्याचा मान मिळाला आहे.
लाडक्या जावयाची मिरवणूक संपूर्ण गावातून वाजत गाजात काढण्यात आली. मारुतीच्या मंदिराजवळ येऊन या जावयाला नवीन कपड्याचा आहेर चढविण्यात आला.