Holi 2021 | कोळी बांधवांनी दर्याराजाच्या साक्षीनं साजरी केली होळी
होळी सण म्हटलं की, ज्याप्रमाणे कोकणवासियांना कोकणची होळी खुणावू लागते अगदी तसाच काहीसा उत्साह कोळी बांधवांमध्येही पाहायला मिळतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहोळीच्या सणानिमित्तानं दर्यावर म्हणजेच समुद्रावर उदरनिर्वाह करणारे कोळी बांधवही हा सण अगदी दणक्यात साजरा करतात.
राज्यात विविध भागांमध्ये असणाऱ्या कोळीवाड्यांमध्ये होळीची रंगत पाहण्याजोगी असते.
यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे होळीचा उत्साह काहीसा कमी असला, तरीही काही परंपरागत गोष्टी मात्र मागे पडलेल्या नाहीत.
कोळीवाड्यांमध्ये असंच चित्र पाहायला मिळालं.
'होळी' सणानिमित्त कोळी बांधवांनी मासेमारीसाठी वापरात असणाऱ्या त्यांच्या होड्या सजवल्या असून त्या दर्याच्या सफरीवरही नेल्या.
रेवस ते करंजादरम्यानच्या समुद्रात कोळ्यांच्या सजलेल्या होड्या पाहायला मिळाल्या. होड्यांच्या नालेला मोठे मासेही बांधण्यात आले होते. रंगीबेरंगी पताका, फुलांच्या माळा या सजावटीसाठी वापरण्यात आल्या होत्या.
कुटुंब आणि मित्रपरिवारासह कोळी बांधवांनी पारंपरिक गाण्यांवर यावेळी ठेका धरत हा सण साजरा केला.