Nanded Lockdown | नांदेडमध्ये लॉकडाऊन निर्बंधांचं उल्लंघन, भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
नांदेडमध्य लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवेच्या आधारे फळ भाजीपाला विक्रीस शासनाने परवानगी दिली आहे. मात्र नांदेडकरांकडून या परवानगीचा फज्जा उडाला आहे. ठोक भाजीपाला विक्रीची परवानगी असताना तेथे आठवडी बाजार भरवला जातोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिल्ह्यात 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान 11 दिवसाचे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी 7 ते 12 या वेळेत ठोक भाजीपाला, फळे विक्रीस परवानगी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
परंतु लॉकडाऊन काळात देण्यात आलेल्या या ठोक फळ, भाजीपाला विक्री परवानगीचा नांदेडकरांनी गैरफायदा घेत कोरोना नियमावलीचं उल्लंघन केलं आहे.
शासनाने लॉकडाऊन कालावधीत फक्त ठोक फळे व भाजीपाला विक्रीची परवानगी दिली असताना शहरातील तरोडा नाका परिसरात मात्र दररोज चक्क बाजार भरवला जातोय.
अत्यावश्यक सेवेत भाजीपाला पुरवठा व नागरिकांना दैनंदिन गरजा उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रशासनाने ही परवानगी दिली असताना अशा प्रकारे नांदेडकर प्रचंड गर्दी करत आहेत.
कोरोना आणि लॉकडाऊनच्या नियमांचा फज्जा उडवत असल्याचं चित्र आहे.
त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यासाठी सुरू केलेल्या या लॉक डाऊनचा कितपत फायदा होईल हे मात्र वेळच सांगेल.