मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस, वाहतुकीवर परिणाम
आज राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या मुंबईसह (Mumbai) परिसरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर वाढल्यानं लोकलच्या वाहतुकीवर परिणाम (Impact on local Train Services) झालाय.
तीनही मार्गांवरची लोकलची वाहतूक उशिराने सुरु आहे. तर पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
पश्चिम उपनगरात अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव मालाड,कांदिवली,बोरिवली ,दहिसर,सांताक्रुझ, वांद्रे परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.
पाऊस वाढल्यामुळं वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम व मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे मुंबईतील काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
मुंबईत दोन दिवस पावसानं उसंत घेतली होती. मात्र, आज पुन्हा पावसाने जोर धरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दादर, वरळी, वांद्रे या पश्चिम उपनगरांमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत मुंबईसह परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.