राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस
राज्यात अनेक ठिकाणी पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजोरदार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढचे 3 ते 4 तास महत्वाचे आहेत, कारण, अनेक भागात वादळी वाऱ्याह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं आहे.
परभणी जिल्ह्यातही जोरदार पावसाला सुरुवात झालीय. रस्त्यांवर पाणीच पाणी साचेलेलं दिसत आहे.
धाराशीव जिल्ह्यातही जोरदार पावसाला सुरुवात झालीय. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे.
जालना जिल्हात कालपासून मृगाच्या पावसाने जोरदार हजेरी लावलीये.
आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
परभणीत पाथरी आणि मानवत तालुक्याला पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील या 2 तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे अनेक ओढ्या नाल्यांना पाणी आले.