Accident: ताबा सुटला, टेम्पोची पुढच्या गाडीला जोरदार धडक; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात

मालवाहू टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं टेम्पोची धडक अज्ञात वाहनाला मागून बसली. धडक एवढी जोरदार होती की, टेम्पोच्या कॅबिनचा पुरता चुराडा झाला.

Accident on Mumbai Pune Expressway

1/10
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा भीषण अपघात झालाय.
2/10
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली हद्दीत पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर हा भीषण अपघात झालाय.
3/10
मालवाहू टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं टेम्पोची धडक अज्ञात वाहनाला मागून बसली.
4/10
धडक एवढी जोरदार होती की, टेम्पोच्या कॅबिनचा पुरता चुराडा झाला.
5/10
टेम्पोनं ज्यावेळी धडक दिली, त्यावेळी चालक आतमध्येच अडकला. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली.
6/10
अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केलं.
7/10
टेम्पोच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला तात्काळ बाहेर काढून स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
8/10
लोकमान्य हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्सनं जखमी चालकाला पनवेलच्या एम. जी. एम. हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आलं.
9/10
अपघातामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मुंबईला जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ अपघातग्रस्त वाहन बाजूला करुन वाहतूक कोंडी दूर केली.
10/10
अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून तिन्ही लेन वाहतुकीस मोकळ्या करण्यात आल्या आहेत.
Sponsored Links by Taboola