महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट आणि पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली
महाराष्ट्रात काही ठिकाणी खासकरुन विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासह गारपिटीचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानुसार पावसाला सुरुवात झाली असून अकोला, अहमदनगर, भंडारा आणि यवतमाळ याठिकाणी तर गारपिटीसह पावसाला सुरुवात झाली आहे.
अकोल्यात मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास गारपिटीसह जोरदार पाऊस झाला आहे. या पावसासोबतच ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी गारपिट देखील झाली.
दुपारनंतर अचानक वातावरणात बदल आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून रब्बीतील हरभरा, गहू आणि तूर पिकांचं नुकसान देखील झालं आहे.
अकोल्यासह अहमदनगर जिल्ह्यातही गारांचा पाऊस पडलेलं पाहायला मिळालं. यावेळी श्रीरामपूर, नेवासा तालुक्यात जोरदार गारपीट झाली.
यानंतर भंडारा आणि यवतमाळ याठिकाणीही वरुणराजाने हजेरी लावली. गारपीट आण पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हवामान खात्याने नव्या वर्षात पुन्हा हुडहूडीची शक्यता वर्तवली असून विदर्भातील किमान तापमान 10 ते 15 अंशसेल्सिअस राहणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.