Guru Purnima 2022 : गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आणि ठाण्यात आनंद दिघेंच्या आनंदाश्रम या निवासस्थानी जाऊन दर्शन घेतले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देत वंदन केलं.
बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाला अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही 50 आमदार करत आहोत असंही ते म्हणाले
सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम आणि राज्याचा सर्वांगिण विकास करण्याचं काम आमचं युती सरकार करणार आहे
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला वंदन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळ असलेल्या आनंद आश्रमात जाऊन वंदन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच ट्विट करत गुरूपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना अभिवादन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच ट्विट करत गुरूपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना अभिवादन केले.
ज गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसैनिकांनी स्मृतिस्थळावर दर्शनासाठी गर्दी केली.