Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chiplun Flood Photo : पावसाचं उग्र रूप, चिपळूणला पुराचा फटका, संपूर्ण शहर पाण्यात
Chiplun Flood : राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती असून अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच कोकणात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाचं उग्र रूप पाहायला मिळत आहे. पावसानं धारण केलेल्या या उग्र रुपानं कोकणातल्या शहरांना पाण्याचा वेढा पडला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट बनली आहे. मुसळधार पावसानं चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर (Chiplun Flood) येऊन नदीचं पाणी शहरात शिरलं आहे.
चिपळूण शहरात जवळपास 5 हजार लोक अडकून पडले आहेत.
संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा पडल्यानं चिपळुणात मदत पोहोचणंही अशक्य बनलं आहे.
चिपळूणचं बसस्थानक असं पाण्यात गेलं आहे.
घरं देखील पाण्याखाली असून लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं जात आहे.
रत्नागिरीत चिपळूणपर्यंतच कोकण रेल्वे वाहतूक सुरु आहे. पुढे सर्व गाड्या चिपळूण रेल्वे स्थानकातच खोळंबल्या आहेत.