Sangli News : खरसुंडीमधील श्री सिद्धनाथ चैत्र यात्रेतील सासनकाठी सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न
आटपाडी तालुक्यातील खरसुंडीच्या श्री सिद्धनाथाचा चैत्र यात्रेनिमित्तचा सासनकाठी, पालखी सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा सोहळा पाहण्यासाठी आणि सिद्धनाथाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, तामिळनाडू कर्नाटकसह अनेक राज्यातून लाखो भाविक श्री सिद्धनाथाच्या खरसुंडी नगरीत दाखल झाले होते.
मानाची लोखंडी सासनकाठी, नवसाची सासनकाठी व पालखी सोहळा खरसुंडीमधील श्री सिद्धनाथ देवाच्या चैत्री यात्रेचे मुख्य आकर्षण असते.
सासनकाठी ही नवसाची असते तर सासनकाठीवर उधळण करण्यात येणारे गुलाल-खोबरे हे पण नवसाचे असते.
श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस आज पार पडला.
यावेळी सिद्धनाथाच्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमानावर खोबरे आणि गुलालाची उधळण भाविकांनी केली.
गुलालाच्या उधळनीने मंदिर परिसर आणि भाविक गुलालात न्हाऊन गेले होते.
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवस्थानाची ओळख आहे.
महाराष्ट्, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील भाविक मोठया संख्येने या यात्रेला हजेरी लावतात.
उद्या रथोत्सवाने या सिद्धनाथच्या यात्रेची सांगता होणार आहे.