PHOTO : ये लगा सिक्सर...! फडणवीसांची मैदानावर जबरदस्त फटकेबाजी, पाहा फोटो
मुंबईत एका क्रिकेट सामन्याच्या उद्घाटनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी फलंदाजी करत काही फटके देखील लगावले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्याच्या परिस्थितीत मला लूज बॉल मिळत आहेत. त्यांना मला सीमारेषेबाहेर पाठवावेच लागते, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी क्रिकेटच्या मैदानातून फटकेबाजी केली आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मला हल्ली सर्व लूज बॉल येत आहेत, बॅटिंग करायला मजा येतेय, मी बॉडिलाईन गोलंदाजी करत नाही, योग्य पद्धतीनं खेळतो.
माझे ठरले आहे की, मी पेस बॉलिंग करणार मी गुगली पण टाकणार आहे. आणि जेंव्हा बॅटिंग का येईल ती ही चांगली करेन. मी योग्य बॉल टाकतो. मी शॉटपिच बॉलिंग करतो. त्याने समोरच्यांना खेळायला अडचण होत आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला बॅटिंग करायला मजा येते. लहानपणी मी बॅटिंग-बॉलिंग दोन्ही करायचो. फिल्डिंग कमी करायचो पण ज्यावेळी करायचो त्यावेळी कॅच सुटायचे नाहीत.
यूपीएचे कॅप्टन बदलण्याच्या विषयावर बोलताना ते म्हणाले की, कॅप्टन बदलावर 16 वा गडी बोलत आहे. त्याच्या म्हणण्याला अर्थ नसते, त्यासाठी टीममध्ये असावं लागतं.
image 7
image 8