Pune Fire : विमान नगरच्या सॉलिटर बिझनेस हबला आग; 2000 कर्मचारी सुरक्षित ठिकाणी हलवले

बिझनेस हबला आग लागल्यामुळे सगळीकडे तारांबळ उडाली आहे.

pune fire

1/8
विमान नगर येथील सॉलिटर बिझनेस हब या आयटी कंपनीमधे दुपारी साडेबाराच्या सुमारास आगीची घटना घडली होती.
2/8
बेसमेंटला असणाऱ्या इलेक्ट्रिक रुममध्ये आग लागून वर शेवटच्या नऊ मजल्यापर्यंत त्याचा धूर मोठ्या प्रमाणात पसरला गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
3/8
अग्निशमन दलाकडून 4 वाहने दाखल करण्यात आली होती.
4/8
या आगीत कोणतीही जीवितहाणी झाली नाही मात्र इमारतीचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे.
5/8
आगीची घटना घडली त्यावेळी 2000 कर्मचारी कार्यरत होते.
6/8
या सगळ्या कर्मचाऱ्यांना आगीची घटना घडल्यावर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं.
7/8
सध्या आग नियंत्रणात असून कुलिंग करण्याचे काम सुरू आहे.
8/8
अचानक लागलेल्या आगीमुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती.
Sponsored Links by Taboola