Vidarbha Ganeshotsav 2022 : विदर्भातील नेत्यांच्या घरी बाप्पांचे आगमन...
Nagpur : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन. मुहूर्ताच्या वेळी सकाळी नितीन गडकरी नागपुरात नसल्याने सारंग गडकरी यांच्याहस्ते गणेशस्थापना करण्यात आली. नंतर दुपारी गडकरी यांनी गणरायाचे दर्शन घेतले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नागपुरातील निवासस्थानी गणेशस्थापना करण्यात आली.
Akola : आमदार अमोल मिटकरी यांच्या अकोल्यातील न्यू तोष्णीवाल ले-आऊट येथील निवासस्थानी गणरायाचे आगमन. बळीराजाला समृद्ध करण्यासाठी आमदार मिटकरींचं गणरायाला साकडं.
Nagpur : रामटेकचे शिवसेना खासदार कृपालजी तुमाने यांच्या सुभेदार ले-आऊट, मानेवाडा रोड, नागपूर येथील निवासस्थानी आज सकाळी श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. खासदार तुमाने यांनी पत्नी रेवती यांच्यासह श्री गणेशाची पूजा व आरती केली.
Wardha : देवळी येथे वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन झाले. विधीवत सहपरिवार गणरायांची स्थापना करून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुखी समाधानी ठेवावे अशी गणराया चरणी प्रार्थना केली.
Nagpur : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी बावनकुळे यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही सहकुटुंब गणेशस्थापना केली.