Pune Ganpati Festival : ढोल ताशाच्या गजरात पंचकेदार मंदिरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान
मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया... च्या गजरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा यंदाची सजावट असलेल्या श्री पंचकेदार मंदिरात विराजमान झाले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्य मंदिरापासून कोतवाल चावडी येथील उत्सवाच्या पारंपरिक जागेपर्यंत फुलांनी सजविलेल्या गरुड रथातून श्रींची भव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 130 व्या वर्षी गणेशोत्सवात श्री पंचकेदार मंदिर साकारण्यात आले आहे.
गणेश चतुर्थीला सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी गुजरात गिरनार येथील गुरु दत्तात्रेय पिठाधीश्वर स्वामी श्री महेशगिरी महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली.
श्रीं च्या मूर्तीसोबत देवी सिद्धी, देवी बुद्धी तसेच गणेश परिवारातील मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या.
मोठ्या जल्लोषात यंदा दगडूशेठ गणपती विराजमान झाले.
image 7
दोन वर्षांनी होणाऱ्या मिरवणुकीला पुणेकरांनी गर्दी केली होती.