In Pics : पेणचे बाप्पा निघाले थायलंडला
मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळं अनेक सणउत्सव अगदी साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाच्या वर्षीही चित्र काहीसं असंच आहे. असं असलं तरीही या सणवारांबाबतची उत्सुकता मात्र तसुभरही कमी झालेली नाही.
अवघ्या तीन महिन्यांवर येऊ घातलेल्या गणेशोत्सवाची तयारी अनेक गणेश चित्रशाळांमध्ये सुरु झाली आहे.
खऱ्या अर्थानं गणपती बाप्पांचा गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, रायगड जिल्ह्यातील पेण येथेही सध्या असंच चित्र पाहायला मिळत आहे.
जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पेण मध्ये तयार होणाऱ्या गणेशमूर्ती महाराष्ट्रासह परदेशातही मोठ्या प्रमाणात पाठवल्या जातात.
यावेळीसुद्धा गणेशोत्सवाच्या तीन महिने किंबहुना त्याआधीपासून इथल्या मूर्तीकारांनी लगबगीने गणरायाचं लोभस रुप साकारण्यास सुरुवात केली.
ज्यानंतर बाप्पाच्या या मूर्ती थायलंडला रवाना झाल्या आहेत. निलेश समेळ यांच्या दीपक कला केंद्र, पेण येथून या मूर्ती परदेशवारीला निघाल्या आहेत.
पहिल्या खेपेत इथून 900 गणेश मूर्ती पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये 1 फूट ते 3 फूट इतक्या उंचीच्या मूर्तींचा समावेश आहे.