Ganesh Chaturthi 2022 : महाराष्ट्रात विविध ठिकाणी गणेशोत्सवाचे पर्यावरणपूरक देखावे; पाहा फोटो
वाचनसंस्कृती वाढावी या उद्देशाने नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने यंदा चक्क पुस्तकांपासून साडेसात फुटी बाप्पा साकारण्यात आला असून यासाठी पावणेदोनशे धार्मिक पुस्तकांचा वापर करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षी वाचनालयात साध्या पद्धतीने गणपतीची स्थापना केली जाते मात्र यंदा प्रथमच सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा केला जात असून वाचनालयात येणाऱ्या प्रत्येकाचं हा बाप्पा लक्ष वेधून घेतोय.
गोंदियात अपना गणेश उत्सव मंडळाने तयार केला अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.
या मंदिरात श्री गणेशाची 15 फूट उंच मूर्ती स्थापित करण्यात आली असून ही मूर्ती छत्तीसगढ राज्यातून तयार करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील अंबिका नगरच्या ओम गणेश मंडळाने चक्क सायकलवर विराजमान गणेश मूर्तीची स्थापना करून आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
दारव्हा येथील मूर्तिकार शशांक वानखडे यांनी सर्वांगसुंदर गणेश मूर्ती साकारली. विशेष म्हणजे ओम गणेश मंडळाने माजी सैनिक संजय गावंडे यांचे हस्ते मूर्तीची स्थापना करीत सामाजिक बांधिलकी जपली.
पिंपरी चिंचवडमधील फिनोलेक्स कंपनीत ही गणेशोत्सव साजरा होतोय. कंपनीने या गणेशोत्सवात विक्रेते अन ग्राहक अर्थात शेतकऱ्यांना मान दिला.
यावेळी विक्रेते आणि शेतकऱ्यांनाही बाप्पांच्या आरतीमध्ये सामील करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील रुपेश वाढणकर यांच्या घरी शेतकर्यांचा बाप्पाची प्रतिकृती साकारली आहे.
या देखाव्यात शेतीविषयक आणि पर्यावरणपूरक अनेक गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत.