PHOTO : तळकोकणातील तिलारी खोऱ्यातील देवतळीत गजराजांनी केलं स्नान
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधतेने संपन्न असलेलं दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोर. याच तिलारीच्या खोऱ्यातील केर गावात असलेल्या देवतळीत गजराजांनी स्नान करत असतानाची सुखद दृश्य वन्यजीव अभ्यासक तुषार देसाई यांनी आपल्या कॅमेरात कैद केली आहेत. (PHOTO : Tushar Desai)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेर गावात वस्ती पासून काही मीटर अंतरावर असलेल्या देवतळीत हत्ती चक्क अंघोळ करतानाची ही एक्सलुझिव्ह दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी कोकणातील आहेत. हत्तीसाठी पोषक असलेल्या तिलारी खोऱ्यात हत्तीचा अधिवास कायम पहायला मिळत आहे.
गेली वीस वर्षे दोडामार्ग तालुक्यामध्ये हत्तीचे वास्तव्य आहे. जास्त करून हंगामी कालावधीमध्ये म्हणजेच काजू, आंबे, फणस यांचा हंगाम असताना हमखास पाहायला मिळतात. गेल्या चार दिवसांपासून त्यांचे केर गावात हत्तीचं वास्तव्य आहे. (PHOTO : Tushar Desai)
केर गावातील देवतळीत हत्ती पाणी पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी येतात. याचं देवतळीच्या आवारात मधमाश्या पेट्यांचा लावण्यात आल्या आहेत. त्यामुळेमानवी वस्तीत हत्ती येऊ नये यासाठी शासनाच्या वनविभागा मार्फत मधमाश्यांच्या पेट्या लावल्या मात्र याचा परिणाम हत्तीवर होत नसल्याचे वन्यजीव अभ्यासक तुषार देसाई यांनी सांगितले. (PHOTO : Tushar Desai)
हत्तींच्या अधिवासासाठी हा भाग पूरक असल्याचे समोर आले आहे. कदाचित येथील वातावरण लक्षात घेऊन हत्ती प्रजनन करण्यासाठी हा भाग निवडत असतील असा आपला अंदाज आहे. आताच्या कळपात एक टस्कर हत्ती मादी आणि दोन पिल्ले यामध्ये एक अडीच वर्षाचे पिल्लू आणि एक अडीच महिन्याचा पिल्लू आहे. (PHOTO : Tushar Desai)