PHOTO : बीडच्या अविनाश साबळेने 30 वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडला
बीड जिल्ह्यातल्या मांडवा गावात शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या धावपटू अविनाश साबळे (Avinash Sable) याने बीडचे आणि देशाचे नाव जागतिक स्तरावर कोरलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअविनाशने अमेरिकेतील सॅन जुआण कॅपिस्टानो येथे झालेल्या साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये पाच हजार मीटर शर्यतीत (US 5000 m steeplechase) धावून धावपटू बहादूर प्रसाद याने केलेला 30 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे.
अविनाश साबळेने या आधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.
ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला नसला तरी स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता.
अविनाशने केलेल्या या नव्या विक्रमामुळे आता अविनाशला आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन हजार मीटर स्टीपलचेस आणि पाच हजार मीटर या दोन्ही प्रकारात उतरवण्याची तयारी करत असल्याची माहिती भारतीय अॅथलेटिक्सचे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.
अविनाश साबळे याने अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये आपल्या धावण्याचा सराव पूर्ण केला.
मोलमजुरी करून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र धावण्यातून आपल्या देशाचं नाव मोठं करण्याचं स्वप्न अविनाश पाहतोय आणि त्यासाठी तो तेवढ्याच हिमतीन सराव देखील करतोय.
आता येत्या काळात तो यशाची आणखी शिखरे सर करतोय का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.