वारकरी पोषाखात पंढरपुरात मुख्यमंत्री शिंदें वारीत सहभागी, निळाबारायांच्या पालखीचे दर्शन घेत वारीचा घेतला आढावा
मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलं संत निळोबारायांच्या पालखीचं दर्शन, खेड पाटी इथं वारकरी पोषाखात टाळ वाजवत मुख्यमंत्र्यांनी वारीत सहभाग घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिळाबारायांच्या पालखीचं दर्शन घेतलंय , मी या पालखीत चालतोय. संपुर्ण महाराष्ट्र वारकरीमय झालाय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मुख्यमंत्री शिंदेंचा दुचाकीवरुन प्रवास, पंढरपुरात 65 एकर जागेवर वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी तर दुचाकीवरुनच दर्शन रांगेचा आढावाही घेतला.
आषाढी एकादशीसाठी मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांची समिती स्थापन, विठ्ठलभक्तांच्या सोयी-सुविधांवर चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन,तानाजी सावंतांची समिती ठेवणार लक्ष.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर शहरामध्ये पोहोचल्यानंतर शासकीय विश्रामगृहावर त्यांनी अधिकाऱ्यांकडून चालू कामांचा आढावा घेतला.
दरवर्षी पंढरपुरात हरीनामाच्या गजरात टाळ-मृदंगाच्या जयघोषात लाखोंच्या संख्येत वारकरी मोठ्या उत्साहात पंढरपूरात विट्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात.
आषाढीचा मुख्य सोहळा बुधवार १७ जुलै २०२४ रोजी होणार आहे. आषाढीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून १५ लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता वर्तविली जात आहे