बरसो रे मेघा मेघा! नाशकात पावसाची जोरदार हजेरी, पाहा खास PHOTOS
जून महिना संपूर्ण कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात नाशिक शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी, त्यात हिरवी गार डोंगररांग यामुळे पावसाचं आल्हाददायक दृश्य बघायला मिळत असून निसर्गाची मुक्तहस्ते उधळण सुरू आहे.
इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्येही आज सकाळपासून पर्जन्यवृष्टी सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्याने निसर्ग खुलला आहे. इगतपुरी तालुक्यात धुक्याची चादर पसरली आहे.
भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी समोर आली असून नाशिक पोलिसांच्या प्रतिबंधित आदेशालाच केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे.
नाशकात यंदाच्या हंगामात 225.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
नाशिकच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने नाशिककरांना वाहने चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नाशिक जिल्ह्यात दि. २० जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सकाळपासून पावसाची संततधार सुरु असल्याने नाशिककरांना छत्र्या, रेनकोटचा वापर करावा लागत आहे.