Nanded : मुसळधार पावसामुळे इस्लापुर येथील सहस्त्रकुंड धबधब्याचा रौद्र अवतार, धबधबा पर्यटकांसाठी बंद!
सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे माहूर जवळच्या धानोड येथे पैनगंगा नदीला पूर आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदी धोक्याच्या पातळी गाठली आहे.
पाण्याचा ओघ वाढून तीस ते चाळीस फुटावरून सहस्रकुंड धबधबा फेसाळत वाहतोय.
दरम्यान पाण्याच्या या वाढत्या प्रवाहांमुळे सहस्त्रकुंड धबधब्याचे रौद्ररूप, अक्राळ विक्राळ दिसत आहे.
पावसाची संततधार सुरूच असून पैनगंगा नदीची पूर परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
किनवट तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टीची झाली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अशा पूर परिस्थितीत व पावसाच्या वाढत्या जोराने सहस्रकुंड धबधब्याने रौद्ररूप धारण केलं आहे.
त्यामुळे ही पूर परिस्थिती व धबधबा क्षेत्रात पाण्याचा वाढता विसर्ग लक्षात घेऊन सहस्रकुंड धबधबा पर्यटकांसाठी दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय.
पर्यटकांनी याची नोंद घेऊन सहस्रकुंड धबधबा पर्यटन स्थळी येऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.