Pune News: राज्यातील शेतकरी चिंतेत, मावळमधील मात्र आनंदी; पहा फोटो

राज्याच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळाताना दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नदी नाल्यांचे पाणी शेतात घुसल्यानं पिकं पाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मात्र उलट चित्र दिसत आहे. इथला शेतकरी या पावसामुळं आनंदात आहे.

हा पाऊस भात शेतीसाठी पूरक ठरत आहे. महिनाभर उशिरा भात लागवड सुरु होऊनही शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला आहे.
राज्यात सद्या धो-धो पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं राज्यातील काही ठिकाणचे शेतकरी चिंतेत आहेत. मावळ तालुक्यातील शेतकरी मात्र, या पावसामुळं आनंदी आहेत.
गेल्या 7 दिवसापासून मावळ तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. भर पावसात शेतकरी भात लागवड करताना दिसत आहे.
गेल्या महिनाभरापासून शेतकरी पावसाची वाट बघत होते. अखेर चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं शेतकरी आनंदी आहेत.