Dudhsagar Waterfalls : दूधसागर धबधब्याला जाणार आहात?, मग थांबा आणि आधी हे वाचा
प्रसिद्धीच्या झोतात आलेला दूधसागर धबधबा पाहायला जाण्यास रेल्वे पोलिसांनी बंदी घातली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या धबधब्याच्या परिसरात पाऊस चांगला झाल्यामुळे धबधबा पूर्ण प्रवाहित झाला आहे.
शनिवारी आणि रविवारी हा धबधबा पाहण्यासाठी कर्नाटक,महाराष्ट्र आणि गोव्यातून हजारो पर्यटक येतात.
पण रेल्वे खाते आणि वन खात्याने धाबधब्याकडे जाण्यास बंदी घातली आहे.
मुसळधार पाऊस आणि रेल्वेची ये जा यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे.
बंदी घातलेली असताना देखील शनिवारी काही उत्साही तरुणांनी धबधब्याकडे जाण्याचा प्रयत्न केला.
पण रेल्वे पोलिसांनी त्यांना रोखून उठाबशा काढण्याची शिक्षा दिली.
दूधसागर धबधबा परिसरात पूर्वी काही अपघात घडून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे आणि वन खात्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.