Palghar : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रस्त्याची चाळण, टोलवसुली करुनही रस्त्यांची दुरावस्था; खड्ड्यांमुळे नागरिक हैराण
रस्त्यांवरील खड्ड्यांचा मोठा फटका येथील स्थानिक नागरिक तसेच वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुजरात सीमेपासून मुंबईपर्यंत चारोटी, खानिवडे आणि दहिसर अशा तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टोल वसुली केली जाते.
टोलवसुली केल्यानंतरही या महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल जात असल्याचं चित्र आहे.
महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेलं आहे. रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे् पडले आहेत.
देखभाल आणि दुरुस्तीचा ठेका असलेल्या कंपनीकडून खड्डे बुजवले जात नसल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गुजरात सीमेपासून मुंबईच्या दहीसर टोल नाक्यापर्यंत आर. के. जैन या कंपनीला देखभाल दुरुस्तीचा ठेका दिला आहे.
आर. के. जैन या कंपनीला रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती तब्बल 26 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.
मात्र तरीसुद्धा या कंपनीकडून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतलं जात नसल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुद्धा झोपेचं सोंग घेतलं आहे का? असा सवाल वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्त्यावरील खड्ड्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.