पावसाळी अधिवेशनाआधी सत्ताधारी जमले, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित चहापान कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री, आदी मान्यवर उपस्थित होते.
दादा, भुसे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
विरोधकांनी मात्र चहापान कार्यक्रमावर बहिष्कार केला.
उद्यापासून (सोमवार 17 जुलै) पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.
हे अधिवेशन मुंबईत (Mumbai News) पार पडणार असून 15 दिवस सुरू राहणार आहे.
अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतरचे पहिलेच अधिवेशन होत आहे. अजित पवार यांचा गट आल्यानंतत सत्ताधाऱ्यांची संख्या वाढली असून, विरोधकाची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांचा सामना कसा करणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.