PHOTO : 'अंधश्रद्धा के खिलाफ लढनेवाला दाभोलकर हूं मैं'; डॉ. दाभोलकरांना अनोखं अभिवादन, फेसबुकवर अंनिसतर्फे मीम स्पर्धा
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया निमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून फेसबुकवर मीम्स स्पर्धा भरवण्यात आलेली आहे.
समाज माध्यमात मीम्स शब्दाचा वापर एका अशा कला कृतींसाठी वापरतो. ज्यात अगदी कमी शब्दात भावना व्यक्त केल्या जातात.
त्यातच मराठी मीम मॉक्स आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वैज्ञानिक दृष्टिकोन हा विषय देत #आम्हीसारेदाभोळकर ही मोहीम राबवली आहे.
अंनिसकडून मीम स्पर्धेत सर्वांना सहभागी व्हायला सांगितले आहे.
समाज माध्यमावर चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळत आहे.
दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत.
यानिमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दोन गटांकडून वेगवगेळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय.
पुण्यात 20 ऑगस्ट 2013 मध्ये अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांची ओंकारेश्वर मंदिराजवळ हत्या करण्यात आली होती.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी डॉ. विरंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. सचिन पुनोळकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींविरोधात आरोप निश्चिती झाली आहे.