Diwali: दिवाळी पाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, पाहा खास फोटो
दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरास झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविठ्ठल चौखांबी , सोलाखांबी , सभा मंडप , रुक्मिणी चौखांबी आणि रुक्मिणी सभागृह येथे ही सजावट केली आहे.
विठ्ठल -रूक्मिणी मंदिरात तुळस, शेवंती, झेंडू, फुलांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक आरास केली आहे.
दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
या आनंदाच्या क्षणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची आरास केली आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दिवाळी पाडवा हा हिंदू धर्मात खूप पवित्र दिवस मानला जातो.
विठुरायाच्या दर्शन घेऊन आजचा दिवस साजरा करण्यासाठी हजारो भाविक पंढरपूरमध्ये आले आहेत.
दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात आली. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मंदिर प्रत्येक सणाला आकर्षक फुलांची आरास, सजावट करण्यात येत असते. (फोटो सौजन्य: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती)