दोन वेळा पंतप्रधानपदाची संधी हुकली, वय झालं आता निवृत्त व्हा, शरद पवारांना मित्राचा सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकीकडे मुंबईत सुरु असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत व्यस्त आहेत. दुसरीकडे त्यांचे मित्र उद्योगपती सायरस पूनावाला यांनी शरद पवार यांना निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शरद पवार हे खूप हुशार व्यक्ती आहेत. त्यांची दोन वेळा पंतप्रधान पदाची संधी हुकली, पण त्यांचे आता वय झाले आहे. त्यामुळे त्यांनी आता निवृत्ती घ्यावी, असा सल्ला सायरस पूनावाला म्हणाले आहेत.

82 वर्षीय शरद पवार सध्या विरोधी पक्षाची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेत आहेत. इंडिया आघाडीच्या प्रत्येक बैठकीला ते उपस्थित असतात.
पुण्यातील एका कार्यक्रमात सायरस पूनावाला यांनी शरद पवार यांना सल्ला दिला आहे.
सायरस पूनावाला म्हणाला की, शरद पवार यांच्याकडे पंतप्रधान होण्याची दोन वेळा संधी होती. पण ती चुकली. शरद पवार एक हुशार व्यक्ती आहे. पंतप्ऱधान म्हणून त्यांनी चांगली सेवा केली असती. पण संधी संपली आहे. माझेही आणि त्यांचेही वय होत आलेय, त्यामुळे आता राजकारणातून निवृत्ती घ्यायला हवी.
अजित पवार यांनी काही आमदारांना घेऊन सरकारमध्ये सामील झाले, त्या प्रश्नावर उत्तर देताना सायरस पूनावाला यांनी शरद पवारांना निवृत्ती घेण्याचा सल्ला दिलाय.