In Pics : तळकोकणातील इको-फ्रेंडली राख्या आता परदेशात
रोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या नारळाच्या करवंटीपासून जर राख्या बनवल्या जातात असं सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. मात्र या टाकाऊ करवंटीपासून मालवणमधील स. का. पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक हसन खान व त्यांच्या विकल्प ब्रँड करवंटीपासून राख्या बनवत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सुबक इको-फ्रेंडली राख्यांची परदेशातील भारतीयांनाही भुरळ पडली आहे. नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या या राख्यांना परदेशात मागणी वाढल्याने राख्या जगभरातील देशात पाठवल्या गेल्या आहेत.
विकल्प नावाच्या पेजवरून या इकोफ्रेंडली राख्या जगाच्या पाठीवर कुठेही मागवता येतात.
हसन खान यांनी विकल्प या हरित व्यवसायातून प्लास्टिकला पर्याय म्हणून नारळाच्या करवंटीपासून इकोफ्रेंडली राख्या व कंदील बनवत आहेत.
आठ रुपये प्रति किलोने करवंट्या घेऊन करवंटीतून हरित वस्तूंची निर्मिती केली जात आहे. यातून प्लास्टिकला पर्यायी वस्तू देखील लोकांपर्यंत पोहोचतील हाच उद्देश डोळ्यासमोर प्लास्टिकला पर्याय शोधणे ही विकल्पची प्राथमिकता आहे.
राख्या नारळाच्या करवंटीचा वापर करून निर्मिती केलेल्या आहेत. तर राख्यांमध्ये बिया म्हणजे रक्षाबंधननंतर कुंडीमधून किंवा मातीखाली घातल्यावर काही दिवसात त्यामधून झाड येईल. या बिया फुलपाखरांचे नेक्टर प्लांटच्या आहेत तर नारळाच्या झावळ्यापासून राखीसाठी इको पॅकिंग बॉक्स करण्यात आले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रामधून या राख्यांना मागणी असून गोवा, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांसोबत लंडनमध्येही राख्या पाठवण्यात आल्या आहेत. राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या आणि सुव्यवस्था राखणाऱ्या सैनिकांना, आर्मी चीफ, राष्ट्रपती आणि गव्हर्नर यांना देखील या राख्या विकल्पने पाठवल्या आहेत.