In Pics | यंदा भाऊरायांची होणार चंगळ! रक्षाबंधनला वडापाव, मसाला डोसापासून लॅपटॉप, फुटबॉलपर्यंत अनेक गोष्टी मिळणार
रक्षाबंधनाचा सण आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. कोरोनाचे सावट यंदाच्याही रक्षाबंधन सणावर बघायला मिळत असले तरी मात्र यावर राखी व्यावसायिकांनी अनेक पर्याय शोधून काढले आहेत. यंदा नाशिकमध्ये अनेक हटके राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्या सणाची भाऊ बहीण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतात. तो रक्षाबंधनाचा सण आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. हिंदू सणांपैकी एक महत्त सण म्हणूनही तो ओळखला जात असल्याने बहिणींची तयारी आता जोरदार सुरु झालीय.
भावा बहिणीचे नाते घट्ट करणाऱ्या या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधत त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तर बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन भाऊ तिला देतो.
राखीच्या दुकानांमुळे बाजारपेठा फुलून गेल्या असून अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातूनही या राख्याची विक्री करत आहे.
नाशिकच्या इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या मैथिली कुलकर्णी हिने तर अनेक हटक्या राख्या बनवल्या असून सोशल मीडियात या राख्यांची सध्या चांगलीच चर्चा रंगलीय. भावाला आवडेल किंवा त्याच्या व्यवसायानुसार बहिणी मैथिलीला राखीची ऑर्डर देतात.
मैथिली त्यानुसार राथी तयार करते. गेल्या आठवडाभरात लॅपटॉप, मसाला डोसा, मिठाई, फुटबॉल, टेनिस, पिझ्झा, वडापाव अशा राखी तिने बनवल्या आहेत..
यंदा राखीच्या किंमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी वाढ झालीय मात्र तरी देखिल याचा कुठलाही परिणाम महिलांवर झाला नसून त्यांचा उत्साह मात्र कायम आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे व्यावसायिक आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र आता कुठे अनलॉक झाल्याने यंदाची राखीपोर्णीमा त्यांच्यासाठी कुठेतरी दिलासादायक ठरेल.
image 9