सिंधुदुर्गातील कुणकेश्वर चरणी देवगड हापुसची आरास, पहा फोटो
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील कुणकेश्वर चरणी हापूस आंब्यांची आरास केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऐतिहासिक कुणकेश्वर मंदिरात शिवलिंग आणि नंदी सभोवताली देवगड हापूसची आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे.
सध्या कोकणात हापूस आंब्याचा सीजन आहे. देवगड मधील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी कुणकेश्वर गावचे ग्रामदैवत असलेल्या कुणकेश्वर चरणी आकर्षक अशी आंब्याची आरास सजवून कुणकेश्वरा चरणी देवगड हापूस भेट अर्पण केले आहेत.
कुणकेश्वर मधील शंकराच्या पिंडी सभोवताली केलेल्या आकर्षक हापूस आंब्याची आरास पाहून आंबे खाण्याचा मोह आवरता येत नाही.
यंदा कोरोनाचे सावट असल्याने साध्या पध्दतीने आंब्याची आरास करण्यात आली असून कोरोनाचे संकट दूर करण्याचं साकडं कुणकेश्वराला घालण्यात आलंय.
कोरोना निर्बंधामुळे सध्या प्रार्थनास्थळं बंद आहेत.