PHOTO: माझाच्या बातमीनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला महाराष्ट्रातून मदतीचा हात
'एबीपी माझा'च्या बातमीनंतर औरंगाबादमधील शेतकऱ्याला अनेकांनी मदतीचा हात दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकरी कुटुंबातील ऋषिकेश चव्हाण या चिमुकल्याची बातमी एबीपी माझा ने दाखवली होती.
त्यानंतर आज अनेक दानशूर लोकांनी ऋषिकेशला दिवाळीसाठी कपडे खरेदी करून दिले आहे.
तर अनेकांनी दिवाळीसाठी लागणाऱ्या पदार्थ आणि रोख रक्कम देऊन मदत केली आहे.
'एबीपी माझा'च्या बातमीनंतर ऋषिकेश आणि चव्हाण कुटुंबाची दिवाळी गोड झाली आहे.
मदत मिळाल्यानंतर भाऊक झालेल्या ऋषिकेश चव्हाणच्या डोळ्यात देखील अश्रू आले.
परतीच्या पावसाने चव्हाण कुटुंबाचे शेतातील पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले होते.
त्यामुळे या कुटुंबातील डोळ्यात पाणी पाहायला मिळत होते.
अशात दिवाळी कशी साजरी करणार असा प्रश्न या कुटुंबाला पडला होता.
मात्र 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर ऋषिकेश आणि चव्हाण कुटुंबाची दिवाळी गोड झाली आहे.