PHOTO: धनत्रयोदशीला लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाली चंद्रभागा, घाटांवर नेत्रदीपक दीपोत्सव
आज दोन वर्षानंतर धनत्रयोदशीच्या गोरज मुहूर्तावर विठुरायाच्या भक्तांनी चंद्रभागेच्या घाटांवर हजारो दिव्यांनी दीपोत्सव साजरा केला.
Pandharpur
1/10
आज देशभरात धनत्रयोदशीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. याचं कारण आहे दोन वर्षांनंतरची निर्बंधमुक्त दिवाळी.
2/10
आज दोन वर्षानंतर धनत्रयोदशीच्या गोरज मुहूर्तावर विठुरायाच्या भक्तांनी चंद्रभागेच्या घाटांवर हजारो दिव्यांनी दीपोत्सव साजरा केला.
3/10
यावेळी हजारों दिव्यांनी चंद्रभागेच्या तीर उजळवून टाकला.
4/10
वारकरी संप्रदायात चंद्रभागेच्या अनन्यसाधारण महत्व आहे.
5/10
आज धनत्रयोदशीदिवशी विठ्ठल रुक्मिणीला पारंपरिक अनमोल दागिन्यात नटविण्यात आले .
6/10
दिवाळी हा दिव्यांचा उत्सव असल्याने घरोघरी दिव्यांची आरास होत असताना चंद्रभागेच्या काठी देखील अशी दिव्यांची आरास केली जाते.
7/10
गेल्या काही वर्षांपासून वारकरी आणि पंढरपूरकर घाटांवर दिव्यांची आरास करीत असतात.
8/10
आज सायंकाळपासून बालगोपाळांसह भाविकांनी एकत्रित येत घाटांवर दिवे लावण्यास सुरुवात केली.
9/10
चंद्रभागेच्या जवळपास 14 घाटांवर हा दीपोत्सव साजरा केला गेला.
10/10
सध्या पुराच्या पाण्यामुळे चंद्रभागा थेट घाटांपर्यंत पोहोचल्याने या दृश्याने चंद्रभागा खूपच खुलून दिसत आहे .
Published at : 22 Oct 2022 10:31 PM (IST)