PHOTO: दौंडमधल्या चिरेबंदी वाड्याची सर्वत्र चर्चा; जबरदस्त वाडा पाहायला होतेय गर्दी, नेमका कसा आहे वाडा- पाहा फोटो
दौंड तालुक्यातील पशु वैद्यकीय डॉक्टरांनी बांधलेल घर सध्या चर्चेचा विषय बनले आहे. दौंड तालुक्यातील खामगाव येथील निलेश जगताप यांनी चिरेबंदी वाडा 2500 चौरस मीटर मध्ये बांधला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याचीच पंचक्रोशीत चर्चा आहे. हा वाडा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकं येत असल्याचे जगताप सांगतात.
निलेश जगताप यांना घर बांधायचं होतं, हे घर बांधताना हटके बांधायचे होत. इमल्यावर इमले बांधणे त्यांच्या संस्कृतीत बसत नाही म्हणून त्यांच्या डोक्यात वाड्याची संकल्पना आली आणि त्यातून हा 2500 चौरस फुटाचा चिरेबंदी वाडा उदयास आला आहे.
हा वाडा जेवढा बाहेरून पुरातन वाटतो तेवढ्याच आतील वस्तू अत्याधुनिक आहेत. बाहेरून बघितला तर हा वाडा दगडाचा वाडा वाटतो तर आतून पाहिल्यास सिमेंटचे घर वाटतं.
जांभा दगडात हा वाडा बांधण्यात आला आहे. घराच्या आतून किचनमध्ये चिमणी बसवण्यात आली आहे.तसेच लाईट अत्याधुनिक बेल देखील बसवली आहे.
हे घर बांधताना पुरातन आणि आधुनिक गोष्टीचा संगम घातला आहे.दारात मोठं तुळशी वृंदावन घराच्या आतमध्ये देवघर, 3 बेडरूम, किचन, स्टोअर रुम, बाथरुम एखाद्या पंचतारांकीत हॉटेलमधील वास्तूप्रमाणे बांधण्यात आल्या आहेत.
घर बांधायला 3 वर्ष लागली, त्यात कोरोना आला. मग तीन ऋतू घर बसल्या कसे अनुभवायला येतील याच्या पद्धतीने आखणी केली.
घरासाठी लागणारा जांभा दगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील पावस मधून आणण्यात आला आहे. तसेच घरात लागणाऱ्या वस्तू या पुणे किंवा आसपासच्या परिसरातून आणल्या आहेत.
रत्नागिरीतील पावस मध्ये 20 रुपयांना मिळणारा जांभा दगड जगताप यांना घरापर्यंत येईपर्यंत 60 रुपयांना पडला.त्यांना घराच्या लागणाऱ्या बजेटचे विचारलं असता ते म्हणतात हौसेला मोल नसते.
आई वडिलांनी छपरात दिवस काढले. मुलाने बांधलेल्या वाड्यात आई वडील आनंदी आहेत. खामगाव मध्ये घरावर घर बांधत नाहीत. त्यामुळे हे वाड्यासारखे बांधले असल्याचे निलेश जगताप यांचे वडील सांगतात.