PHOTO: राज्यपालांसह भाजप नेत्यांविरोधात बीडमध्ये मूकमोर्चा, जिल्हा बंदची हाक
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह विविध महापुरुषांविषयी कथित वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांविरोधात बीडमध्ये मूकमोर्च काढण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.
यावेळी बीड शहरात मूकमोर्च काढण्यात आला.
शहरात विविध पक्ष-संघटनांनी मोर्चाला पाठिंबा दिला.
यावेळी काळ्या फिती लावून निषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला होता.
आंदोलनात शिवप्रेमींसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होते.
बीडसह सर्व तालुक्यांच्या ठिकाणी व मोठ्या बाजारपेठा असलेल्या गावांमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.
मूक मोर्च्यात महिलांसह तरुणांचा लक्षणीय सहभाग होता.
यावेळी मोर्चेकरी काळ्या फिती लावून सहभागी झाले होते.