तुळजाभवानी माता मंदिर परिसरात नवरात्रीच्या आधीच तुफान गर्दी!
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव उद्या दुपारी 12 वाजता घटस्थापनाने सुरू होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरंतु, कालपासूनच देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे लाखोंच्या संख्येने भाविक तुळजापूर येथे मंदिर परिसरात दाखल झाले आहेत.
दररोज 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. तरीही लाखो भाविक मंदिर परिसरात आले आहेत. त्यामुळे नवरात्रात काय होईल याची ही चुणूक मानली जात आहे.
आलेल्या भाविकांपैकी जवळपास 80 टक्के भाविक विनामास्क दिसत आहेत.
या गर्दीत सोशल डिस्टन्स पाळणे शक्य होताना दिसत नाहीत. 15 हजारपैकी 7 हजार पास हे ऑनलाईन तर 8 हजार पास ऑफलाईन दिले जाणार आहेत.
उद्यापासून राज्यातील मंदिरे धार्मिक स्थळे सुरू होणार आहेत. घोषणा केल्याप्रमाणे 2 डोस पूर्ण झालेल्या भाविकांना प्रवेश असले तरी तुळजापूर शहरात प्रवेश केल्यावर डोस तपासणारी यंत्रणा दिसत नाही.
तुळजाभवानी मंदिर परिसरात 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षाखालील मुले यांना प्रवेश नाही.
तरीही आज मंदिर परिसरात अनेक लहान बालके, ज्येष्ठ नागरिक विनामास्क खुलेआम फिरताना दिसत आहेत.
दररोज 15 हजार भक्तांना तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.
15 हजार पैकी 7 हजार पास हे ऑनलाइन तर 8 हजार पास हे ऑफलाईन मिळणार आहेत.
तुळजाभवानी दर्शनासाठी दररोज तुळजापूर येथे लाखो भाविकांची गर्दी होते. त्यामुळे प्रशासनाला नियोजनाची कसरत करावी लागणार आहे.
लसीकरण न झालेल्या भाविकांना 72 तासांपूर्वीचा आरटीपीसीआर अहवाल दाखवणे बंधनकारक आहे.
गर्दी न करता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन बंधनकारक आहे.