दिवाळीत गायींना चटईवर बसवण्याची स्पर्धा; ग्रामीण भागातील अनोखी प्रथा
दिवाळीत गाय पूजनाच्या दिवशी गायींना चटईवर बसविण्याची पारंपरिक प्रथा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यासाठी आतापासूनच ग्रामीण भागात गायींना चटईवर बसविण्याचा सराव सुरू करण्यात येतो.
सर्वत्र लंपी आजार पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर गायींना या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे.
खबरदारीचे उपाय आखून सराव केला जात आहे.
महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पशुपालक हे महादेवाच्या मंदिरासमोर चटईवर सात गाई बसवतात.
पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या या परंपरेचा पालन या गावात केले जाते.
काळी दौलत खान परिसरात अनेक गावांमध्ये मंदिरासमोर गाई बसवण्याची प्रथा आहे.
दिग्रस तालुक्यातील वरंधळी या गावात मोठ्या उत्सवाने स्पर्धा घेण्यात येते.
विहित वेळेत या गावी एका चटईवर बसवण्याचा यामध्ये नियम असतो.
शेतकरी मोठ्या उत्साहाने गायी बसविण्याचा सराव करताना दिसत आहे.