विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाताय? मग ही नियमावली नक्की वाचा...
ओमायक्रॉन संसर्गाचे सावट आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने राज्यात जमाव बंदी व इतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.(Photo:@PandharpurVR/Twitter)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिर्डीतील साई संस्थानानंतर पंढरपूरच्या विठ्ठल मंदीर प्रशासनानेही दर्शनाच्या वेळेवर बंधने आणली आहेत. रात्री 9 वाजता विठूरायाचे मंदीर भाविकांसाठी बंद होणार आहेत. मंदीर प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (Photo:@PandharpurVR/Twitter)
राज्य सरकारने घेतलेल्या जमाव बंदीच्या निर्णयाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पंढरपूरमध्ये नाताळाच्या सुट्टीमुळे भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे(Photo:@PandharpurVR/Twitter)
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीही गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ लक्षात घेता मंदीर प्रशासनाने जमाव बंदीच्या अनुषंगाने काही निर्णय घेतले आहेत. (Photo:@PandharpurVR/Twitter)
त्यानुसार आता भाविकांसाठी रात्री 9 वाजता मंदीर बंद ठेवण्यात येणार आहे.(Photo:@PandharpurVR/Twitter)
मुळे भाविकांना विठूरायाच्या दर्शनासाठी रात्री 9 वाजण्याच्या आधीच मंदिरात प्रवेश करावा लागणार आहे.(Photo:@PandharpurVR/Twitter)
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात रात्री 9 नंतर जमावबंदी आदेश दिल्याने आजपासून विठ्ठल मंदिर रात्री नऊ वाजता भाविकांसाठी बंद राहणार आहे. (Photo:@PandharpurVR/Twitter)
शिर्डीतही नवीन नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे (Photo:@PandharpurVR/Twitter)
(Photo:@PandharpurVR/Twitter)