एक्स्प्लोर
Corona Guidlines : वाडा येथील रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या विवाह समारंभावर धडक कारवाई

4
1/5

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही काही लोक नियम पायदळी तुडविण्याचा प्रयत्न करत आहेत, याचं उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं.
2/5

वाडा तालुक्यातील खरीवली मध्ये 'अनच्याव्यू रिसॉर्ट'वर दिनांक 29 एप्रिल रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी वाडा आणि तहसिलदार वाडा यांना माहिती मिळाल्यानंतर अचानकच धाड टाकण्यात आली.
3/5

धाड टाकली असता सदर ठिकाणी जवळपास 100 जण लग्न समारंभ करण्यासाठी एकत्र आले होते.
4/5

सदर लग्नास सक्षम अधिकारी यांची परवानगी घेतली नसल्याने महाराष्ट्र शासनाने लग्न कार्यासाठी घालून दिलेल्या निर्बंधाचा भंग केल्याने वर पिता, वधू पिता आणि केटरर्स यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5/5

नियमांचा भंग केल्याने 50 हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला असून, सदरचे रिसॉर्ट सिल करण्याची कारवाईही करण्यात आली आहे
Published at : 30 Apr 2021 07:22 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
