Bharat Jodo: भारत जोडो यात्रेत आज नारी शक्तीचा सहभाग
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि आयर्न लेडी अशी ओळख असलेल्या इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने आज भारत जोडो यात्रेत काँग्रेसची नारी शक्ती सहभागी होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत जोडो यात्रेला आज गजाननदादा पाटील मार्केट यार्ड, शेगाव येथून सुरुवात होणार आहे. त्यानंतर जलंब या ठिकाणी सकाळी 10 वाजता विश्रांतीसाठी ही यात्रा थांबेल.
दुपारी चार वाजता जलंब येथून पुन्हा एकदा पदयात्रेला सुरुवात होणार आहे.
आज इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त यात्रेत प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होणार आहेत.
महिला भारतयात्री, काँग्रेसच्या महिला खासदार, महिला आमदार, महिला पंचायत समिती सदस्य, महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या या राहुल गांधींसोबत चालणार आहेत.
आज सायंकाळी शेगावातील भस्तान या ठिकाणी सायंकाळची कॉर्नर सभा होणार आहे आणि त्यानंतर भेंडवळ या ठिकाणी रात्रीची विश्रांती घेण्यात येणार आहे.
काल शेगावमध्ये राहुल गांधी यांनी गजानन महाराजांचे दर्शन घेतलं. राहुल गांधी यांनी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात रांगेत उभे राहत महाप्रसाद ग्रहण केला. आपले ताट स्वत: उचलून वॉश बेसिनमध्ये नेले.
राहुल गांधी यांना मंचावर पोहोचताच वारकऱ्यांचा फेटा घालण्यात आला.
त्यानंतर राहुल गांधी यांनी जंगी सभा घेतली आणि विविध प्रश्नांवर केंद्र सरकारवर टीका केली. भीती, हिंसा, द्वेषानं तोडलं जातं तर प्रेमानं सर्व जोडलं जातं. भारत जोडोचं ध्येय हे 'मन की बात' करण्यासाठी नाही, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला
70 दिवसांआधी ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरु झाली. समुद्रकिनारी यात्रेला सुरुवात झाली. प्रत्येक दिवशी 25 किलोमीटर ही यात्रा चालते. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र आणि आता महाराष्ट्रात ही यात्रा आली.