निळ्या समुद्रात माश्याच्या आकाराचं बेट, कोकणातील हे अनोख सुंदर ठिकाण तुम्ही पाहिलात का?
कोकण हा जैवविविधतेने नटलेला प्रदेश आहे. येथे वेगवेगळे ऋतू आणि वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे निसर्गाचे अनेक चमत्कार पहायला मिळतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनारळी पोफळीच्या बागा, स्वच्छ सुंदर समुद्र किनारे, हिरवेगार डोंगर रांगा, खळखळुन वाहणाऱ्या नद्या आणि रसाळ फणसासारखे कोकणी माणूस. म्हणूनच देश विदेशातील पर्यटकांना कोकणचे हे निसर्ग सौंदर्या खुणावत असत.
कोकणात अनेक नैसर्गिक सौदर्याने नटलेली, बहरलेली ठिकाण आहेत. अश्याच एका ठिकाणचा फोटो आहे. ज्याचं नाव आहे मालवण तालुक्यातील देवबाग जवळचं सुनामी आयर्लंड.
जेव्हा सुनामी वादळ आलं होतं तेव्हा त्याची निर्मिती झाली होती. मात्र, या ठिकाणचं नाव जरी सुनामी आयर्लंड असलं तरी ते वरून म्हणजेचं आकाशातून पाहताना माश्याच्या आकाराचं दिसत.
एका बाजूला देवबाग तर दुसऱ्या बाजूला कर्ली खाडीच्या मध्ये असलेलं हे ठिकाण पाहताना असं वाटतं जसं निळ्या समुद्राच्या मध्यावरती जणू मासा ठेवलेला आहे.
सुनामी आयर्लंड या ठिकाणाचं सौंदर्य पाहून प्रत्येकाला तेथे जाण्याची इच्छा होते. देशविदेशातील अनेक पर्यंटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येतात.
या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला साहसी समुद्र क्रीडा प्रकार, स्कुबा, पॅरासिलिंग, डॉल्फिन सफर, सिगल पक्षी, आजूबाजूला नारळी पोफळीच्या बागा आणि जवळच असलेला ब्लु फ्लॅग मानांकनासाठी निवड झालेला भोगवे समुद्र किनारा पाहता येणार आहे.
हे सारं पाहण्यासाठी तुम्हाला बोटीने फिरावं लागेल.
माश्याच्या आकाराचं आयर्लंड.