Christmas Celebration : ख्रिसमसनिमित्त लोणावळा आणि माथेरानमध्ये पर्यंटकांची गर्दी, ताडोबा सफारीलाही पसंती
जागोजागी रंगीबेरंगी सजावट आणि रोषणाई केल्याचं पाहायला मिळत आहे. नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटन स्थळांवर गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appख्रिसमस आणि न्यू इअरनिमित्त ताडोबा व्याघ्रप्रकल्प पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. पर्यटकांच्या गर्दी मुळे व्याघ्र प्रकल्पातील 112 गाड्यांची ऑन-लाईन बुकिंग तर झालीच आहे.
याशिवाय स्पॉट बुकिंगसाठी उपलब्ध असलेले ताडोबातील 4 कॅन्टर, मिनीबस, VIP कोट्यातील गाड्या आणि बफर क्षेत्रातल्या सर्व जिप्सी पण हाउसफुल झाले आहेत.
विशेष म्हणजे यावर्षी नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक मंत्री, आमदार आणि अधिकारी टायगर सफारीसाठी ताडोबात दाखल झाले आहेत.
विशेष म्हणजे यावर्षी नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक मंत्री, आमदार आणि अधिकारी टायगर सफारीसाठी ताडोबात दाखल झाले आहेत. त्यामुळे ख्रिसमस आणि न्यू इअरच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांमुळे ताडोबात चैतन्य निर्माण झालं आहे.
ख्रिसमस आणि लाँग विकेंडनिमित्त रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. माथेरानच्या निसर्गाचा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले आहेत.
माथेरान हे मुंबईजवळील थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबई, पुण्यासह देशभरातून पर्यटक माथेरानमध्ये दाखल झालेत.
लोणावळा हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. थंडी असो किंवा पावसाळा या ऋतुंमध्ये लोणावळा हे कायम गजबजलेलं असतं. खाण्यापिण्याची चंगळ तर असतेच पण इथल्या वातावरणामुळे लोकांना इथे येण्याची ओढ असते.
नाताळ आणि न्यू इअर या दोन्ही कारणांमुळे सध्या लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आहे. वेगवेगळ्या शहरांमधून लोक कुटुंबासह इथे वीकेंडसाठी म्हणून आले आहेत.
मुंबई, ठाणे, नाशिक या महानगरांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर मधील पश्चिम किनारपट्टीवरील केळवे पर्यटन स्थळावर सध्या पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. नाताळ आणि ख्रिसमसनिमित्त पालघर मधील केळवे पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
केळवेचा उथळ, सपाट समुद्रकिनारा आणि याच समुद्रकिनाऱ्यालगत असलेल घनदाट जंगल यामुळे येथील निसर्गरम्य परिसर पर्यटकांना भुरळ घालतोय.
नाताळनिमित्त आता कोकणात गर्दी वाढताना दिसत आहे. गणपतीपुळेपासून जवळ असलेल्या मालगुंडला देखील सध्या पसंती मिळत आहे.
या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्सच्या काहीतरी थ्रीलिंग ऍक्टिव्हिटी करण्यास पर्यटक पसंती देत आहेत. शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा असल्याने मालगुंडला देखील पसंती मिळत आहे
कोकणात नाताळ आणि वीकेंडच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. तळकोकणातील मालवण, दांडी, चिवला, तारकर्ली, देवबाग, कुणकेश्वर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकाची मोठी गर्दी आहे.
मालवणी खाद्य संस्कृती सुद्धा आनंद पर्यटक लुट आहेत. डॉल्फिनचे दर्शन देखील मालवण चिवला समुद्रकिनारी पर्यटकांना होतंय. प्यारासिलिंग, बनाना राइट्स यासारख्या समुद्र साहसी क्रीडांचा आनंद पर्यटक लुटत आहेत.