Photo : लोणार सरोवराच्या पाणी पातळीत मोठी वाढ, पुरातन मंदिरे पाण्यात
तब्बल चौदा वर्षांनी जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. अचानक पाणी पातळीत वाढ झाल्यानं चिंतेत वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असणाऱ्या लोणार सरोवराच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळं परिसरातील प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहे. त्यामुळं अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली आहे.
लोणार हे जगातील प्रसिद्ध सरोवर आहे. लोणार हे जगातल सर्वात मोठं अंडाकृती सरोवर आहे. उल्कापातामुळे या सरोवराची निर्मिती झाली आहे.
लोणार सरोवर हे जगातील दुसरं सर्वात मोठं सरोवर आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत तब्बल 14 वर्षानंतर मोठी वाढ झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळं लोणार सरोवर परिसरात असलेल्या पाच मंदिरांना पाण्यानं वेढा दिला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळं जमिनीतील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. चांगल्या पावसामुळं लोणार सरोवरात असलेले झरे हे प्रवाहित झाले आहेत.
अनेक पाण्याचे झरे हे डिसेंबर महिन्यात अजूनही वाहत आहेत. त्यामुळं लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं सरोवरातील पाच पुरातन मंदिरे पाण्यात गेली आहेत.
पाण्यात वाढ झाल्यामुळं प्राचीन मंदीरे पाण्याखाली गेली आहेत. आधीच या मंदिराची अवस्था जीर्ण झाली आहे. दरम्यान याकडे पुरातत्व विभागाचे लक्ष नसल्याचे येथील अभ्यासकांनी म्हटलं आहे.
जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत तब्बल 14 वर्षानंतर मोठी वाढ झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळं लोणार सरोवर परिसरात असलेल्या पाच मंदिरांना पाण्यानं वेढा दिला आहे.
पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळं लोणार सरोवर अभ्यासकांना आता चिंता सतावू लागली आहे. यावर्षा पाऊस चांगला झाल्यामुळं सरोवरातील झरे प्रवाहीत झाले आहेत.
लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली आहे. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे.