PHOTO: जायकवाडी पक्षी अभयारण्यातील डोळ्यांचे पारणे फेडणारे द्दश्य
जायकवाडी पक्षी अभयारण्यात विविध प्रकारची बदके, सुरय, कुरव आणि करकोचे अशा पक्ष्यांचे थवेच्या थवे पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपक्ष्याचे शेकडोंच्या संख्यने घरटी रामडोह, गळनिंब, वरखेड, बोरगाव या परिसरात केलेल्या निरीक्षणात आढळून आली.
विशेष म्हणजे यावर्षी जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्ष्यांचे आगमन उशिरा झाले आहे.
देशांतर्गत स्थलांतर करणारे पक्षी साधारणतः आपल्याकडे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात यायला सुरुवात होते.
नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात विदेशी पक्ष्यांचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर वाढते.
मात्र यावर्षी सर्वत्र लांबलेला पावसाळा बदलत चाललेले ऋतुचक्र यामुळे, पक्ष्यांचे स्थलांतर उशिरा सुरू झाले.
तर इथून पुढे थंडी जशी वाढेल तसे पक्षी येताना दिसतील.
सद्या जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्ष्यांचे आगमन सुरु झाले असून, डोळ्यांचे पारणे फेडणारे द्दश्य पाहायला मिळत आहे.